Shah Rukh Khan – अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) चित्रपट सुपरहीट ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली. चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूखचा ‘पठाण’ चित्रपट रिलीज झाला होता.
त्याचा हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. शाहरूख खानच्या पठाण आणि जवान (Jawan) या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींच्यावर कमाई केली आहे.
हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर लवकरच शाहरुखचा ‘डंकी’ हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, किंग खानच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच, आज 2 नोव्हेंबर रोजी ‘डंकी’चा अधिकृत टिझर सुद्धा रिलीज करण्यात आला आहे.
दरम्यान, या सोबतच आज पासून सिनेरसिकांना ‘जवान’ चित्रपट Netflix वर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix) वर हिंदी, तमिळ आणि तेलगू मध्ये जवान (Jawan) रिलीज झाला आहे. ‘X’ वर शाहरूख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ही खूषखबर शेअर केली आहे.
Birthday Jawan ka hai par gift sab ke liye 😎We’re good to go!
Jawan (the extended cut) is now streaming in Hindi, Tamil and Telugu, only on Netflix 💥 pic.twitter.com/SBNBM9hBFB— Netflix India (@NetflixIndia) November 1, 2023
‘जवान’ सिनेमा 7 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. जवान सिनेमामध्ये नयनतारा, विजय सेतुपल्ली, दीपिका पदुकोण, प्रियमणी, सान्या मल्होत्रा आणि गिरीजा ओक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.