Kaali Peeli Taxi : गेल्या सहा दशकांपासून मुंबईची ओळख असलेली “प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी (Kaali Peeli Taxi) सोमवारपासून बंद होणार आहे. ही टॅक्सी सेवा “काली-पिली’ (Kaali Peeli Taxi) म्हणून प्रसिद्ध होती, जी तिच्या रंगाचा संदर्भ देते. आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून कालबाह्य होणार आहेत. यापूर्वी “डबल डेकर’ बसनेही मुंबईतील रस्त्यांचा निरोप घेतलेला आहे.
शेवटची “प्रीमियर पद्मिनी’ 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी (Kaali Peeli Taxi) म्हणून नोंदणीकृत झाली होती. शहरात टॅक्सी चालवण्याची मर्यादा 20 वर्षे असल्याने सोमवारपासून “प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी अधिकृतपणे मुंबईत चालणार नाहीत.
मुंबईच्या शेवटच्या नोंदणीकृत प्रीमियर पद्मिनी टॅक्सी (एमएच-01-जेए-2556) मालक प्रभादेवी यांनी ही काळी पिवळी टॅक्सी मुंबईची आणि आपल्या आयुष्याची शान आहे, असे मत व्यक्त केले आहे. यासह त्याचवेळी रस्त्यावर किंवा संग्रहालयात किमान एक “प्रीमियर पद्मिनी’ जतन करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वाड्रोस यांनी यावेळी बोलताना आठवण करून दिली की “प्रीमियर पद्मिनी’चा टॅक्सी म्हणून प्रवास 1964मध्ये “फियाट-1100 डिलाइट’ मॉडेलने सुरू झाला होता. त्यानंतर पुढील सहा दशके या टॅक्सीने मुंबईतील रस्त्यांची कास धरली.
आता तिचे रस्त्यांवरील अस्तित्व संपने निश्चितच वेदनादायी आहे. काही वर्षांपूर्वी, शहरातील सर्वात मोठी टॅक्सी चालक संघटना असलेल्या मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने किमान एक काळी-पिवळी टॅक्सी टिकवून ठेवण्याची विनंती सरकारकडे केली होती, पण त्याला अद्यापही यश आलेले नाही.
लोकांचे भावनिक संबंध !
डॅनियल सिक्वेरा, विंटेज टॅक्सी कार शौकीन, यावेळी म्हणाले की, या टॅक्सी सहा दशकांहून अधिक काळ शहराचा भाग आहेत आणि अनेक पिढ्यांपासून त्यांच्याशी सर्वसामान्यांचा भावनिक संबंध आहेत.
तर परळचे रहिवासी आणि कलाप्रेमी प्रदीप पालव यांनी यावेळी सांगितले की, आजकाल “प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी केवळ मुंबईतील भिंतींवर असलेल्या स्मारकांमध्येच दिसतात. ते हळूहळू नाहीसे झाले असले तरी तिने लोकांच्या हृदयात वेगळे असे स्थान निर्माण केले आहे.