नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘डंकी’ (Dunki) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता त्याच्या डंकी या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमधून सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
भारताच्या एक दिवस आधी ‘डंकी’ परदेशातील चित्रपटगृहात धडकणार आहे. त्यानिमित्त आता सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 22 डिसेंबर डंकी चित्रपटाची रिलीज डेट देण्यात आली आहे. यामध्ये शाहरुखने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि आर्मी प्रिंटचा कार्गो घातला आहे.
View this post on Instagram
यात शाहरुखचा पाठमोरा फोटो आहे. तर पोस्टरवर लिहिले की, ‘सैनिकाचा वचनपूर्तीच्या दिशेने प्रवास’. शाहरुख यामध्ये सैनिकाच्या भूमिकेत आहे आणि वचन पूर्ण करण्यासाठी त्याला जगभर फिरावं लागत आहे. याशिवाय पोस्टरमध्ये रिलीज डेट 21 डिसेंबर 2023 दिली आहे. हा सिनेमा भारतात रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच परदेशात रिलीज होणार आहे.
अलीकडेच ‘डंकी’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले. ‘जवाना’ने जगभरात 1200 कोटी रुपये कमावले आहेत तर पठाणने जगभरात 1000 कोटी रुपये कमावले आहेत. ‘डंकी’मधून शाहरुखने पहिल्यांदाच राजकुमार हिरानींसोबत काम केलं आहे. या सिनेमात तापसी पन्नू, बोमन ईरानी, दिया मिर्झा मुख्य भूमिकेत असणार आहे.