Cyclone Tej : अरबी समुद्रात ‘तेज’ चक्रीवादळ (Tej Cyclone )तयार झाले आहे. पुढील 24 तासात हे वादळ तीव्र होण्याचा शक्यता आहे. हे चक्रीवादळ 25 ऑक्टोबर रोजी येमेन आणि ओमान दरम्यान जाणार आहे. त्यानंतर हे वादळ शांत होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. हे वादळ 22 ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास अतिशय तीव्र चक्री वादळात रूपांतरित होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे चक्रीवादळ अरबी समुद्रातील यंदाच्या वर्षातील दुसरं चक्रीवादळ आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. तेज चक्रीवादळाचं रविवारी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन ओमान आणि शेजारील येमेनच्या दक्षिण किनार्याकडे सरकण्याचा अंदाज हवामान विभागकडून सांगण्यात आले आहे.
सध्या तेज चक्रीवादळ यमनच्या साकोत्रा किनाऱ्यापासून 550 किलोमीटर पूर्व-दक्षिण पूर्वेकडे आहे. हे वादळ येमेनजवळ 600 किमी पूर्व-आग्नेयेकडे सरकत आहे. हे वादळ येमेन-ओमान किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन आंधप्रदेश आणि तामिळनाडूमधील किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा दिला आहे.
मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचे सांगितले आहे. तेज चक्रीवादळाचा गुजरात किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे. तसकह या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. मात्र भारतीय तटरक्षक दलाने चेन्नई, आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टी भागात अनेक जहाजे तैनात केली आहेत. तसेच मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.