Syria Drone Attack : सीरियातील होम्स शहरातील लष्करी अकॅडमीवरवर मोठा ड्रोन हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या द्रोण हल्ल्यात तब्बल 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 240 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
सीरियाच्या स्थानिक माध्यमांनाआरोग्य मंत्री हसन अल-घाबाश यांनी याविषयी माहिती दिली आहे. मृतांमध्ये सहा मुलांसह काही लष्करी जवानांचा समावेश आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे घाबाशा यांनी म्हटले आहे.
सीरियाच्या मध्यवर्ती शहर होम्समध्ये लष्कराच्या ‘पासिंग आऊट परेड’ कार्यक्रमादरम्यान हा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. यात 80 लोक ठार आणि 240 हून अधिक जखमी झाले. अलिकडच्या वर्षांत सीरियन सैन्यावरील हा सर्वात प्राणघातक हल्ला असल्याची माहिती एका आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, सीरियामध्ये गेल्या तेरा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.
होम्स शहराचे आरोग्य संचालक डॉ. मुसलेम अल-अतासी यांनी सांगितले की, हल्ल्यांचा परिणाम होम्समध्ये होत असलेल्या समारंभावर झाला कारण तो संपण्याची वेळ जवळआली होती. जखमींमध्ये नागरिक आणि लष्करी जवानांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. अल-अतासी यांनी सांगितले की, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सीरियातील तिसरे मोठे शहर होम्समधील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.