Sara Ali Khan Paris : सारा अली खान सध्या पॅरिसमध्ये तिच्या मित्रांसोबत खूप एन्जॉय करत आहे. साराने पॅरिसमधून सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहे. ज्यात ती फुल ऑन मस्ती करताना दिसली. या फोटोंमध्ये सारा कधी रंगीबेरंगी शर्टमध्ये तर कधी सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसली. साराने उत्कृष्ट कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहे.
सारा अली खान दररोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणाहून फोटो शेअर करत असते. साराने शेअर केलेले लेटेस्ट फोटो पॅरिसचे आहे, जिथे ती तिच्या जवळच्या मैत्रिणीसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसली. या फोटोंमध्ये सारा कधी तिच्या मैत्रिणीसोबत पोज देताना तर कधी आईस्क्रीम खाताना दिसली.
पॅरिस व्हेकेशनचे सर्व फोटो साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कॉफी, संस्कृती आणि सूर्यास्त. ‘बदाम कॅपुचिनो’. सारा अली खानचे हे कॅप्शन आणि फोटो पाहता, ती सध्या तिच्या डाएट रूटीनचे पालन करत नसल्याचे स्पष्ट होते.
सारा अली खान विकी कौशलसोबत ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात दिसली होती. जो यावर्षी 2 जून रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केले होते. चित्रपटातील सारा आणि विकीची धमाल आणि केमिस्ट्री लोकांना आवडली होती. याआधी सारा ‘गॅसलाइट’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये सारासोबत विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत होता. चित्रपट काही विशेष दाखवू शकला नाही. सारा अली खान ही सैफ आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे.
,