The Vaccine War – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) चित्रपटाची घोषणा केली होती.
तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र, नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सिनेमाने बॉक्स ऑफीसवर हवं तसं यश मिळलं नाही.
हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) तीन दिवसात 4 कोटींची कमाई करू शकला नाही. वीकेंडलाही चित्रपटाची जादू चालू शकली नाही.
पहिल्या दिवशी 0.85 कोटी रुपयांची कमाई केली होती, म्हणजेच पहिल्या दिवशी हा चित्रपट 1 कोटी रुपयांचीही कमाई करू शकला नाही. तर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाची अवस्था आणखीनच बिकट होती आणि केवळ 0.9 कोटींचा व्यवसाय केला. आता तिसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 1.50 कोटींची कमाई केली आहे. वीकेंड असल्याने चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली असून एकूण कलेक्शन 3.25 कोटींवर पोहोचले आहे. आगामी काळात हा चित्रपट आणखी किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या सिनेमात नाना पाटेकर, अनुपम खेर, नाना पाटेकर, रायमा सेन, मोहन कपूर आणि पल्लवी जोशी सारखे दमदार कलाकार दिसत आहेत. चित्रपट हिंदीसह इतर अनेक भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.