नवी दिल्ली : तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर देशभर रान उठले आहे. त्यातच आता त्याची केलेल्या वक्तव्यानंतर उदयनिधी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला तब्बल १० कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अयोध्येतील पुजारी परमहंस आचार्य यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील तपस्वी छावनी मंदिराचे मुख्य पुजारी परमहंस आचार्य म्हणाले, “स्टॅलिन यांचं शीर कापून माझ्याकडं आणणाऱ्याला मी १० कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करतो. जर कोणामध्ये स्टॅलिन यांना मारण्याची हिंमत नसेल तर मी स्वतःचं जगातील कुठल्याही कोपऱ्यातून त्यांना शोधून काढून मारुन टाकेन” असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे.
Ayodhya Seer Paramhans Acharya reiterates his death threat to TN Minister Undayanishi Stalin over his ‘Sanatana Dharma should be eradicated’ remark, he says “…If Rs 10 crores is not enough for beheading him, I will increase the reward, but the insult of ‘Sanatan Dharma’ will… pic.twitter.com/kT1G0a7TGv
— ANI (@ANI) September 5, 2023
सनातन निर्मुलन कार्यक्रमात बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी, “सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्याविरोधात आहे. त्यामुळं काही गोष्टींना विरोध केला जाऊ शकत नाही तर तो नष्टच केला पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया, मच्छर किंवा कोरोनाला विरोध करु शकत नाही या गोष्टी संपवाव्याच लागतात” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून त्यांचा विरोध करण्यात येत आहे.
दरम्यान, परमहंस आचार्यांनीच यापूर्वी देखील रामचरितमानसवर टीका करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे शीर कापणाऱ्याला तसेच पठाण सिनेमात दिपिका पादुकोननं परिधान केलेली बिकीनी भगव्या रंगात दाखवल्याबद्दल अभिनेता शाहरुख खानला जिवंत जाळणाऱ्याला रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती.