बीड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल रविवारी बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार गटातील छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या सारखे अनेक नेते उपस्थित राहिले होते. मात्र या सभेदरम्यान गोंधळ निर्माण झाला होता. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणादरम्यान थेट शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ही परिस्थिती पाहता छगन भुजबळ यांनी काही वेळातच भाषण संपवले.
बीडमध्ये पावसामुळे अजित पवार गटाची सभा उशिरा सुरु झाली. त्यात सर्व नेत्यांच्या भाषणामुळे ही सभा आणखीच लांबली. सर्व नेत्यांच्या भाषणानंतर अजित पवार सर्वात शेवटी बोलेले. मात्र छगन भुजबळ यांनी भाषणादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली. यामुळे कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. अखेर ही परिस्थिती पाहता त्यांनी लवकरच आपले भाषण संपवले.
बीडकरांना सलाम!
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!!ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.#Armstrong
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 27, 2023
नेमकं काय घडलं?
बीडमधील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. अनेक दिवसांची खदखद त्यांनी सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच बोलून दाखवली. यावेळी आपल्याला राजीनामा अचानक द्यायला शरद पवारांनी सांगितले, ईडी कारवाई झाली त्यावेळी मला आणि समीर भुजबळ यांना जेलमध्ये जावे लागले. परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील आम्ही पक्ष सोडला नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. यादरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि यामुळे छगन भुजबळ यांना भाषण आटोपते घ्यावे लागले.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांवर टीका करत बीडकरांचे आभार मानले. आव्हाड यांनी ट्वीट करत ‘बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.”