तुर्कस्तानच्या दक्षिण भागात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. गुरुवारी रात्री 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप या ठिकाणी झाला असल्याची माहिती समोर आली आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू मालत्या प्रांतातील येसिलर्ट शहरात होता. या भूकंपामुळे आतापर्यंत 23 जण जखमी झाले आहेत. यात आणखी काही लोक जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, मालत्या आणि अदियामानमध्ये इमारती कोसळल्याने लोक जखमी झाले आहेत. भूकंपापासून वाचण्यासाठी लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या. तसेच समोर येत असलेल्या व्हिडिओमध्ये भूकंपामुळे इमारतींचेही नुकसान झाल्याचे दिसत आहे.
An earthquake of magnitude 6.0 strikes Hokkaido in Japan, German Research Centre for Geosciences (GFZ) said: Reuters
— ANI (@ANI) August 11, 2023
तर दुसरीकडे, जपानमधील होक्काइडो येथेदेखील 6.0 तीव्रतेचा भूकंप झाल असल्याचे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसने सांगितले आहे. मात्र सध्या येथील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.