माल्मो (स्वीडन) :- गेल्या महिन्यात तेल सुविधा केंद्रासमोर केलेल्या पर्यावरणविषयक आंदोलना- दरम्यान पोलिसांचे म्हणणे न ऐकल्याबद्दल प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला स्वीडनच्या न्यायालयाने 2,500 क्रोनोर (अंदाजे 240 डॉलर) इतका दंड ठोठावला आहे.
मात्र तरीही 20 वर्षीय ग्रेटा थनबर्गचा उर्मटपणा कमी झालेला नाही. तिने वस्तुस्थिती काय होती हे मान्य केले, मात्र आपला गुन्हा मान्य केला नाही. जीवाश्म इंधन उद्योगाविरुद्धचा लढा हा हवामान संकटाच्या अस्तित्वाच्या आणि जागतिक धोक्यामुळे स्वसंरक्षणाचा एक प्रकार होता.
नियम लागू करून आपण जगाला वाचवू शकणार नाही, असे ती पत्रकारांशी बोलताना म्हणाली. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकणार नाही, असे तिने ठामपणे सांगितले.
दिनांक 19 जून रोजी माल्म शहरात तेल सुविधा केंद्राजवळ आंदोलन करत असताना पोलिसांनी अडवल्यानंतरही ग्रेटा थनबर्ग आणि तिच्या साथीदारांनी तेथून निघून जाण्यास नकार दिला होता.