मुंबई – अभिनेत्री काजोलने डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. ही मालिका प्रदर्शित झाली असून या व्हवेंब सीरिजला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका चर्चेत असण्याचे एक कारण म्हणजे या OTT प्रोजेक्टसाठी काजोलने 23 वर्षांनंतर तिची नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. काजोलने नोयोनिका सेन गुप्ताची भूमिका केली आहे आणि यात तिचे सहकलाकार एले खान आणि जिशू सेन गुप्ता यांना काजोल किस करताना दिसत आहे.
काजोलचे हे किसिंग सीन दोन वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले आहेत. काजोलच्या या किसिंग सीनवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी काजोलच्या तिच्या सहकलाकारांसोबतच्या केमिस्ट्रीची प्रशंसा केली, तर अनेकांनी तिच्या या वयात लिप-लॉक सीनवर टीका केली. एका एपिसोडमध्ये काजोलला दोनदा लिप लॉक करताना दाखवण्यात आले आहे. सीनमध्ये काजोल भावनिक भारलेल्या स्थितीत दाखवण्यात आली आहे. या मालिकेत काजोलची भूमिका दोन मुलांची आई असून ती वकील आहे. मात्र, यात दोघेही लिपलॉक व्यक्तिरेखा आणि परिस्थितीला न्याय देताना दिसत आहेत.
‘द ट्रायल’ ही वेब सीरिज ‘द गुड वाईफ’ या अमेरिकन वेब सीरिजचे हिंदी रूपांतर आहे. मालिकेत, काजोल (नयोनिका) ची व्यक्तिरेखा अनेक आव्हानांमधून जाते जेव्हा तिला कळते की तिचा नवरा तिची फसवणूक करत आहे. या मालिकेत काजोलशिवाय शीबा चड्ढा, कुब्बरा सैत आणि गौरव पांडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.