मुंबई – अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. कारण या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री प्रियांका चोप्रा मध्यंतरी निघून गेली. त्यानंतर फरहान अख्तरने प्रियंका चोप्राच्या जागी अभिनेत्री अनुष्का शर्माला या चित्रपटासाठी ऑफर दिली, परंतु अनुष्का शर्माने फरहान अख्तरच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
View this post on Instagram
याआधी कतरिना कैफला या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते, मात्र काही कारणास्तव तिनेही चित्रपट करण्यास नकार दिला होता, त्यानंतर चित्रपटाचे काम सध्या थांबवण्यात आले आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
प्रियांका चोप्राने ‘जी ले जरा’ या चित्रपटाची ऑफर सोडली आहे, कारण तिला आता हॉलिवूडमधील तिच्या करिअरला वेळ द्यायचा आहे. त्यामुळेच तिने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांकाने चित्रपट सोडल्यानंतर आता कतरिना कैफने फरहान अख्तरचा चित्रपट नाकारल्याची चर्चाही समोर येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री अनुष्का शर्माला प्रियंका चोप्राच्या जागी ‘जी ले जरा’ ची भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु अभिनेत्रीने तिच्या व्यस्त शेड्यूलचे कारण देत हा चित्रपट नाकारला.अनुष्का फरहान अख्तरच्या चित्रपटासाठी खूप उत्साही होती, परंतु निर्माते तिच्याकडून ‘जी ले जरा’साठी ज्या तारखा मागत होते, त्या दरम्यानचा वेळ आधीच तिने बुक केला होता त्यामुळेच अनुष्काने या चित्रपटासाठी नकार दिला आहे.