नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कॅनडातील सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. निज्जर हा कॅनडातील शीख फॉर जस्टिसचा (एसएफजे) प्रमुख होता. हरदीपसिंग निज्जर हा खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता आणि तो कॅनडात बसून भारताविरुद्ध देशविरोधी कारवाया करत होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, कॅनडातील गुरू नानक शीख गुरुद्वारा सरेजवळ दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली. निज्जर या गुरुद्वाराचे प्रमुखही होते. शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्याही तो जवळचा होता.
खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीपसिंग निज्जर कॅनडात बसून संघटना चालवत होता. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने हरदीप निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. यानंतर निज्जरची जालंधरच्या भरसिंग पुरा गावातील मालमत्ताही जप्त करण्यात आली. निज्जरने याच गावातील पुजाऱ्याची हत्या केली होती. याद्वारे तो पंजाबमध्ये धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करत होता. एनआयएने निज्जरवर १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने 4 महिन्यांपूर्वी निज्जरच्या केटीएफ संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. गृहमंत्रालयाने म्हटले होते- “खलिस्तान टायगर फोर्स ही कट्टरतावादी संघटना आहे. ज्यांचा उद्देश पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरवण्याचा आहे. पंजाबमधील टार्गेट किलिंगमागेही या संघटनेचा हात आहे. ही संघटना भारताच्या प्रादेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.