मुंबई – मरीन ड्राईव्हमधील वसतिगृहातील तरुणी हत्या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत मुलीच्या संवेदनशील भागांवर आणि शरीरावर कोणताही विशिष्ट लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मात्र, मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलीस डीएनए चाचणीसह अन्य चाचण्यादेखील करणार आहेत. मृतदेह आढळल्यावरची परिस्थिती पाहता पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान, आता अन्य चाचण्यांचे अहवाल समोर आल्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
मरीन ड्राईव्हच्या वसतिगृहातील पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात लैंगिक अत्याचाराशी संबंधित कोणतेही तथ्य आढळलेले नाही. अशातच अद्याप पूर्ण अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नसल्याचीही माहिती मिळत आहे.
अशातच आता याप्रकरणी पोलीस डीएनए चाचणीसह इतरही अनेक चाचण्या करणार आहेत. तसेच, याप्रकरणी पोलिसांचा सखोल तपासही सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता आणि परिस्थिती पाहून प्राथमिक तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे हत्या आणि भारतीय दंड संहितेच्या 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.