फिलाडेल्फिया : भारतीय वंशाच्या 21 वर्षीय विद्यार्थ्याची फिलाडेल्फियामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जुड चाको असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असल्याचे समजते आहे.
रविवारी एका अज्ञात बंदुकधाऱ्याने त्याला गोळी गालून मारल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे पालक केरळच्या कोल्लम जिल्ह्यातून सुमारे 30 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.
ज्युड चाको हा विद्यार्थी आणि अर्धवेळ कर्मचारी होता. लुटण्याच्या प्रयत्नादरम्यान दोन जणांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या वर्षात दोनदा अशाच प्रकारात अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे.
पोलिसांच्या कोलंबस विभागाने यापूर्वी म्हटले होते की, आंध्र प्रदेशातील 24 वर्षीय एका विद्यार्थ्याची 21 एप्रिल 2023 रोजी अमेरिकेतील यूएसमधील इंधन स्टेशनवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. साईश वीरा हा विद्यार्थी ओहायोमध्ये इंधन स्टेशनवर काम करत होता.