मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे प्राजक्ता माळी आपल्या फॅन्सला देखील अनेकदा रिप्ले देताना दिसते. अभिनेत्री,एक उत्तम अँकर अशा विविध रूपात आपण प्राजक्ताला पाहिले आहे. प्राजक्ता डायरीसुद्धा लिहिते हे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे वेळात वेळ काढून अभिनेत्री डायरी लिहिते. प्राजक्ताने स्वतः आपल्या डायरीबाबतचा एक किस्सा सर्वांसमोर आणला आहे.
प्राजक्ताने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकदा खुलासे केले आहेत. यावेळी तिने तिची डायरी लिहिण्याबाबतची सवय सांगितली आहे. ती म्हणते मी लहानपणासून डायरी लिहायचे पण एकदा माझिया डायरी आईच्या हाती लागली आणि तिने मला झाडूने झोडपून काढले. त्यानंतर जोपर्यंत आपल्याला वेगळा चावीबंद कप्पा मिळत नाही तोपर्यंत डायरी लिहिली नसल्याचे यावेळी अभिनेत्रीने सांगितले.
प्राजक्ता माळी म्हणाली की, आपल्या आयुष्यात जे जे खरे असते ते आपण कोणाला सांगू शकतो का? ते आपल्याला जज करत असतील का? गैर फायदा घेत असतील का ? असे कितीतरी विचार मनात येत असतात तेव्हा आपण सगळे नाही बोलू शकत.म्हणून ते सगळं कागदावर उतरवल्यानंतर त्यावेळी आपल्याला काय वाटले होते ? तेव्हा आपण कोणत्या परिस्थितीमध्ये होतो ? का हसलो होतो अशा अनेक गोष्टी जाणून घेताना छान वाटत. तसेच आपल्याकडे २००७-०८ च्या डायऱ्या असल्याचे देखील यावेळी प्राजक्ताने सांगितले.
प्राजक्ता माळी म्हणते, “मी अकरावीला असताना माझी डायरी आईला सापडली आणि माझी वाट लागली.मी घरी आल्यानंतर आईने मला बेदम चोपले तुम्ही इमॅजिन करा म्हणजे त्या डायरीत काय लिहिलेले असेल” असं प्राजक्ता म्हणते. एरवी पडद्यावर आणि टीव्ही स्क्रिनवर सोज्वळ चेहऱ्यामध्ये दिसणाऱ्या प्राजक्ता माळीने हा तिचा किस्सा सांगितल्यानंतर सर्वच जण आवक झाले. डायरी लिहीन बंद झाल्यानंतर त्या शब्दांचे रूपांतर कवितेत झाल्याचे देखील प्राजक्ताने यावेळी सांगितले.