सातारा -पोलीस रेकॉर्डवरील आरोपी हितेश सुरेश मानकर याला स्थानिक गुन्हे शाखेने शिरवळ येथे फुल मळा नावाच्या शिवारातील एका हॉटेलसमोरून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या बंदूक जप्त करण्यात आली आहे. हितेश मानकर याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी हितेश मानकर हा त्याच्या साथीदारासह दुचाकी (एमएच-11-सीझेड-6278) वरून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर शिरवळ हद्दीतील हॉटेल जय श्रीरामसमोर देशी बनावटीचे पिस्तूल विकायला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक शिरवळला रवाना केले. या पथकाने हॉटेलच्या परिसरात सापळा लावून हितेश मानकरला पकडले. त्याच्या अंगझडतीत 65 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तू सापडले. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, आतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, विशाल पवार, विक्रम पिसाळ, अमित सपकाळ, प्रवीण कांबळे, प्रमोद सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार, शिवाजी गुरव यांनी ही कारवाई केली. सातारा पोलीस दलाने नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत एकूण 32 देशी बनावटीची अग्निशस्त्रे व 40 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.