Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

ईशान, सूर्यकुमार व तिलकने पाडला रन्सचा पाऊस ! मुंबईने उडवला पंजाबचा धुव्वा

by प्रभात वृत्तसेवा
May 4, 2023 | 8:35 am
A A
ईशान, सूर्यकुमार व तिलकने पाडला रन्सचा पाऊस ! मुंबईने उडवला पंजाबचा धुव्वा

मोहाली -ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व टीम डेव्हिड यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. संपूर्ण लढतीत मुंबईच्या फलंदाजांनीच वर्चस्व राखले. त्यातही ईशान किशन व सूर्यकुमारच्या फलंदाजीने पंजाबच्या गोलंदाजांची तारांबळ उडाली होती.

पंजाबने विजयासाठी दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवात पुन्हा निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा डावातील पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर कॅमेरून ग्रीनने ईशान किशनला साथ देत संघाला अर्धशतकी पल्ला पार करून दिला. ग्रीन 23 धावांवर परतला. त्याने 18 चेंडूत 4 चौकार फटकावले. यावेळी आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने वादळ निर्माण केले. त्याने किशनच्या साथीत वेगाने धावा करत संघाचे शतक फलकावर लावले.

या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण करताना संघाला दीडशतकी मजलही मारून दिली. अर्शदीप सिंगनेच जास्त धावा बहाल केल्या. मात्र, त्यानेच प्रचंड भरात असलेल्या सूर्यकुमारला तंबूचा रस्ता दाखवला. अनावश्‍यक फटका मारून सूर्यकुमार बाद झाला.

मात्र, त्यापूर्वी या जोडीने 116 धावांची बहुमोल भागीदारी केली. बाद होण्यापूर्वी सूर्यकुमारने आपल्या 66 धावांच्या खेळीत 31 चेंडूत 8 चौकार व 2 षटकार फटकावले. टीम डेव्हिड किशनला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला. यावेळी किशनने अनावश्‍यक फटका मारत आपली विकेट बहाल केली. त्याने अवघ्या 41 चेंडूत 75 धावांची अफलातून खेळी करताना 7 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर मात्र तिलक वर्माने टीम डेव्हिडसह डाव सावरला. त्यांना 18 चेंडूत 21 धावांची गरज होती.

या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांची वाताहत करत आवश्‍यक धावा 7 चेंडूत व 6 गडी राखून हा सामना जिंकला. तिलक वर्मा 10 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांसह 26 धावांवर नाबाद राहिला. टीम डेव्हिड 10 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावांवर नाबाद राहिला. पंजाबकडून नाथन एलिसने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, लियाम लिव्हिंगस्टोन व जितेश शर्मा यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मर्यादित 20 षटकांत 3 गडी गमावून 214 असा धावांचा डोंगर उभारला. एकवेळ 3 बाद 95 अशा बिकट स्थितीतून लिव्हिंगस्टोन व जितेशने संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी दिली. प्रभसिमरन सिंगने यावेळी मात्र साफ निराशा केली. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने मॅथ्यू शॉर्टच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. धवन स्थिरावला असे वाटत असतानाच 20 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 30 धावांवर परतला.

शॉर्टही आक्रमक खेळीही पियुष चावलाने संपुष्टात आणली. त्याने 26 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 27 धावा केल्या. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने जितेश शर्माच्या साथीत संघाला शतकी पल्ला पार करून दिला. या जोडीने संघाचे दीडशतक फलकावर लावले.

दरम्यान, लिव्हिंगस्टोनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने यानंतर धावांचा वेग वाढवताना आक्रमक फलंदाजी केली. त्याने जितेशच्या साथीत संघाचे द्विशतकही पार केले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी नाबाद 119 धावांची भक्‍कम भागीदारी केली. जितेशला मात्र अखेरच्या षटकात फारसा स्ट्राइक मिळाला नाही व तो अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.
लिव्हिंगस्टोनने नाबाद 82 धावांची खेळी करताना 42 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. जितेशने नाबाद 49 धावांच्या खेळीत 27 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावले. मुंबईकडून पियुष चावलाने 2 तर अर्शद खानने 1 गडी बाद केला.

लक्षवेधी
प्रभसिमरन सिंग
साफ अपयशी
चांगल्या सुरुवातीनंतर धवनकडून निराशा
शॉर्टही अनावश्‍यक फटकेबाजीमुळे परतला
या दोघांना बाद करत चावलाने अडसर दूर केले
लिव्हिंगस्टोनचे
वादळी अर्धशतक
जितेश शर्माच्या
नाबाद 49 धावा
सुर्यकुमार व इशान किशनची वादळी फलंदाजी
दोघांचीही दमदार अर्धशतके
तिलक वर्मा व टीम डेव्हीडचीही उपयुक्त खेळी
रोहित शर्मा पुन्हा अपयशी

संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 3 बाद 214 धावा. (शिखर धवन 30, मॅथ्यू शॉर्ट 27, लियाम लिव्हिंगस्टोन नाबाद 82, जितेश शर्मा नाबाद 49, पियुष चावला 2-29, अर्शद खान 1-48). मुंबई इंडियन्स – 18.5 षटकांत 4 बाद 216 धावा. (ईशान किशन 75, सूर्यकुमार यादव 66, कॅमेरून ग्रीन 23, तिलक वर्मा नाबाद 23, टीम डेव्हिड नाबाद 19, नाथन एलिस 2-34).

Tags: IPL 2023ishaanmumbai indiansPUNJABSuryakumar Yadavtilakईशानतिलकमुंबईसूर्यकुमार
Previous Post

देशी बनावटीची बंदूक जप्त

Next Post

पाटण वगळता जिल्ह्यात भाकरी जागेवरच

शिफारस केलेल्या बातम्या

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे
राष्ट्रीय

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

4 hours ago
Punjab: शिरोमणी अकाली दलाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
क्राईम

Punjab: शिरोमणी अकाली दलाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

1 day ago
“मला फक्त ग्लॅमरस भूमिकांसाठी…” अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बॉलीवूडबद्दल खुलासा
बॉलिवुड न्यूज

“मला फक्त ग्लॅमरस भूमिकांसाठी…” अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बॉलीवूडबद्दल खुलासा

3 weeks ago
World Cup 2023 : सूर्यकुमारची कामगिरी निर्णायक ठरेल – बांगर
क्रीडा

World Cup 2023 : सूर्यकुमारची कामगिरी निर्णायक ठरेल – बांगर

3 weeks ago
Next Post
#UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा

पाटण वगळता जिल्ह्यात भाकरी जागेवरच

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: IPL 2023ishaanmumbai indiansPUNJABSuryakumar Yadavtilakईशानतिलकमुंबईसूर्यकुमार

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही