नवी दिल्ली : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.खुद्द शिंदे यांनी याविषयी ट्विट करुन माहिती दिली आहे.
शिंदेनी केलेल्या ट्विटमध्ये ‘डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी’, अशी विनंती केली आहे.
डॉक्टरों के परामर्श पर कराई गई कोविड-19 कि जाँच में मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है। आप सभी से मेरा अनुरोध है कि पिछले कुछ दिनों में जो भी मेरे सम्पर्क में आएं हैं, वो सभी सावधानी बरतें या निकटतम स्वास्थ्य केंद्र पर जाकर अपनी जाँच करवायें।
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) April 17, 2023
ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांना देखील 13 एप्रिल रोजी करोनाची लागण झाली आहे. त्यांना खोकला आणि सर्दीची त्रास झाल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या जयविलास पॅलेसमधील विलगीकरणात आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण कुटुंब करोना चाचणी करण्यात आली.
दरम्यान, देशात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. रोज करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशातील काही राज्यात मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आले आहे.