मोहाली :- आज IPL 2023 चा पहिला डबल हेडर खेळला जाईल. डबल हेडरचा पहिला सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना पंजाबच्या होम ग्राउंड मोहाली येथे खेळला जात आहे.
या हंगामात दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह स्पर्धेत उतरत आहेत. अनुभवी शिखर धवन पंजाबची कमान सांभाळत आहे तर नितीश राणा केकेआरचे नेतृत्व करत आहे. जखमी श्रेयस अय्यरच्या जागी राणाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघ प्रथमच चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत आहे. गेल्या मोसमानंतर ब्रेंडन मॅक्क्युलमने कोलकाता संघाचं प्रशिक्षकपद सोडले होते.
🚨 Toss Update🚨@KKRiders win the toss and elect to field first against @PunjabKingsIPL.
Follow the match – https://t.co/UeBnlhdZdr #TATAIPL | #PBKSvKKR | #IPL2023 pic.twitter.com/DQ93WNdCFz
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
कोलकाता नाईट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टीम साऊदी, अनुकुल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करण, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.