मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप ऑन-स्क्रीन जोडप्यांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा हे दोघे पडद्यावर एकत्र येतात तेव्हा धमाका करतात.
View this post on Instagram
नुकतेच ‘पठाण’ या चित्रपटातून दोघेही लोकांची मने जिंकताना दिसले. अशात एका इव्हेंट शाहरुख खानचा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे. स्टालीश शालीन नाथानीने शाहरुख खानचे फोटो सोशल मीडिया शेअर केले आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईकचा वर्षाव केला आहे. या फोटोवर दीपिकानेही हटके कॉमेंट्स केली आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या जोडीने ‘पठाण’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये चमक दाखवली आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या शालीनाच्या लेटेस्ट लूकच्या फोटोंवर प्रतिक्रिया देण्यापासून दीपिका स्वतःला रोखू शकली नाही. शाहरुख खानचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये बॉलिवूडचा बादशाह काळ्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होता.
शालीनाने शाहरुखचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘डेड’ लिहिले आणि लव्ह आय इमोजी बनवली. दुसरीकडे, अभिनेत्याचा स्मार्टनेस पाहून दीपिका पदुकोणने शालिनाच्या कमेंटला जोडून लिहिले, ‘मी टू.’ दीपिकाची ही प्रतिक्रिया चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.