नवी दिल्ली – राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. हा सामना जिंकून अफगाणिस्तानने मालिका 2-0 अशी खिशात घातली. पाकिस्तानला यावेळी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने एक चेंडू राखून लक्ष्य गाठले आणि 7 गडी राखून विजय मिळवला.
टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर सैम अयुबने 2 चेंडूंचा सामना केला आणि तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मोहम्मद हारिस 9 चेंडूत 15 धावा करून स्वस्तात बाद झाला. अब्दुल्ला शफिकही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर तय्यब ताहिरने 23 चेंडूत 12 धावा केल्या. संघाकडून इमाद वसीनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 57 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शादाब खानने 32 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाकडून फारुकीने 2 बळी घेतले, तर नवीन-उल-हक, रशीद खान आणि करीम जनात यांनी 1-1 बळी घेतला.
अफगाणिस्तान संघाने १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. संघासाठी सलामीवीर रहमान उल्ला गुरबाज आणि उस्मान घनी यांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. घनी अवघ्या 9 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. यानंतर गुरबाज आणि इब्राहिम जद्रान यांनी संघाचा डाव सांभाळला.
गुरबाजने 49 चेंडूत 44 धावा केल्या तर झद्रान 38 धावांवर बाद झाला. त्याचवेळी नजीबुल्ला झद्राननेही 12 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. त्याला मोहम्मद नबीने साथ दिली, त्याने 9 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. तर पाकिस्तान संघाकडून नसीम शाह आणि जमान खान यांना १-१ बाली घेण्यात यश मिळाले.