नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांची बहुचर्चित ‘फर्जी’ वेब सिरीज सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. या मालिकेत प्रतिभावान अभिनेते के. के. मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर मुख्य भूमिका साकारताना दिसले आहेत. ही सिरीज 10 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे.
सध्या ही सिरीज केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर हिट झाली आहे. अनेक देशांमध्ये ‘फर्जी’ टॉप 10 च्या यादीत आला आहे. बनावट नोटा आणि पोलिसांची चकमक असा फुल्ल ड्रामा या मालिकेत अनुभवायला मिळतो. फर्जी मधील प्रत्येक सिन हा अतिशय कमालीचा असून, सोशल मीडियावर देखील याचे अनेक रिल्स व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, असा एक व्हिडीओ सध्या सगळीकडे तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये ‘फर्जी’ वेब सीरिजचा एक सीन रिक्रिएट करण्यात आला आहे. धावत्या कारमधून पैसे उडवल्याचा हा सिन आहे. वेब सीरिजमधील दृश्याप्रमाणेच एक तरुण गाडीची डिग्गी उघडून नोट्स उडवू लागतो. तर दुसऱ्या गाडीतून एक व्यक्ती त्यांची शुटींग देखील करत आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणांवर कडक कारवाई केली आहे.
इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या वाहनावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे, ती गाडी जोरावरसिंग कलसी यांच्या नावावर असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तो युट्यूबर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Two arrested for throwing currency notes from running car in Haryana’s Gurugram
Read @ANI Story | https://t.co/uU0gqSfCp9#Gurugram #Haryana #CurrencyNotes pic.twitter.com/AvGnevRKXU
— ANI Digital (@ani_digital) March 14, 2023
जोरावर सिंग कलसी हे दिल्लीतील टिळकनगर येथील रहिवासी आहेत. पोलीस सध्या जोरावरचा शोध घेत आहेत.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात जोरावारने 2 मार्च रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही रील पोस्ट केल्याचे समोर आले आहे. जोरावर आपला जोडीदार लकीला नोटा उडवायला सांगतो. वेब सीरिजमधील दृश्याप्रमाणेच लकी गाडीची डिग्गी उघडून नोट्स उडवू लागतो. मात्र, ज्या नोटा फेकण्यात आल्या होत्या, त्या बनावट वाटत होत्या. याची चौकशी देखील पोलीस अधिकारी करत आहे.
#WATCH | Haryana: A video went viral where a man was throwing currency notes from his running car in Gurugram. Police file a case in the matter.
(Police have verified the viral video) pic.twitter.com/AXgg2Gf0uy
— ANI (@ANI) March 14, 2023
पोलिसांनी सांगितलं की, कार चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. मात्र दुसऱ्या व्यक्तीची आणि दुसऱ्या वाहनातून शुटींग करणाऱ्या ओळख पटलेली नाही. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी असल्याचं सांगत या तरुणाने सांगितलं आहे. मात्र, पोलिस जोरावर याला अटक करून त्यांची संपूर्ण चौकशी करत असल्याचं सुद्धा यावेळी सांगितलं.