मुंबई – ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे लव रंजन हे आजच्या काळात प्रेम आणि नाते संबंधांना धरून आपल्या अनोख्या अंदाजसाठी ओळखले जातात. तसेच, त्यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट कायम पाहायला मिळते ती म्हणजे सुंदर सेट्स आणि सुंदर आऊटडोर लोकेशन्स. अशातच, त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’ 8 मार्च मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. रणबीर कपूर आणि श्रद्धाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ ला होळीच्या सणाचा खूप फायदा झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.73 कोटींचा व्यवसाय केला असून, आगामी दिवसांमध्ये चित्रपटाची कमाई आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
View this post on Instagram
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या या चित्रपटाचे वर्णन एक मजेदार रोमँटिक ड्रामा चित्रपट म्हणून केले जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने केवळ अॅक्शन, ड्रामा, रोमान्स दाखवला नाही तर अनेक भावनिक दृश्ये चित्रित करून रणबीरने चाहत्यांना वेड लावले आहे. दरम्यान, ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातून अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत.