मुंबई – अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ‘चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र, महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे अडचणीत आलेली जॅकलीन फर्नांडिस सध्या जामीनावर बाहेर आहे.
अश्यातच दिल्लीच्या मंडोली कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला एक पत्र लिहलं असल्याचं समोर आलं आहे. या पत्राद्व्यारे त्याने अभिनेत्रीला होळीच्या खास शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुकेश चंद्रशेखरने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “मी माझ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो. रंगांच्या या सणावर, मी तुला वचन देतो की तुझे रंग फिके पडले असतील किंवा गायब झाले, मी ते तुला 100 पटीने परत करीन ही माझी जबाबदारी आहे…
तुला माहित आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईन, मी तुझ्यावर प्रेम करतो, हसत राहा.’ तू माझ्यासाठी काय आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. लव्ह यू प्रिसेंस..! असं त्याने आपल्या पत्रात लिहलं आहे.
दरम्यान, सुकेशने अभिनेत्री जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर 10 कोटी रुपये खर्च केले. तो चार वेळा जॅकलिनला चेन्नईत भेटला आणि चार्टर्ड प्लेनवर 8 कोटी रुपये खर्च केले. तसेच तिला अनेक महागडे गिफ्ट देखील दिले आहेत. ज्याची चर्चा आज देखील सगळीकडे होताना दिसत आहे.