नवी दिल्ली – दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अबकारी प्रकरणी तुरुंगात आहेत. दिल्ली न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांना सोमवारी (६ मार्च) तिहार तुरुंगात नेण्यात आले, तेथे त्यांना तुरुंग क्रमांक १ च्या वॉर्ड क्रमांक ९ मध्ये ठेवण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीष सिसोदिया यांना वृद्धांच्या कक्षात ठेवण्यात आले आहे.
माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया हे २४ तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहेत. तिहार तुरुंगातील सूत्रांनी सांगितले की, सध्या मनीष सिसोदिया यांच्यासोबत कोठडीत एकही कैदी नाही, मात्र येत्या काही दिवसांत त्यांच्यासोबत एका कैद्याला ठेवण्यात येणार आहे. मनीष सिसोदिया तुरुंगात पोहोचल्यानंतर पहिली वैद्यकीय चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल नॉर्मल आला, त्यानंतर ते त्यांच्या सेलमध्ये गेले.
सिसोदिया यांनी रात्रीच्या जेवणात काय खाल्ले?
मनीष सिसोदिया यांना तुरुंग कर्मचाऱ्यांनी स्पर्श किट दिले आहे. या किटमध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, साबण आणि काही भांडी यांसारख्या दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू आहेत. तिहारमध्ये कैद्यांची जेवणाची वेळ संध्याकाळी 6.30 ते 7.30 पर्यंत असते. रात्रीच्या जेवणात डाळ, रोटी, भात, बटाटा-मटार करी होती. सिसोदिया यांना तुरुंगात 2 ब्लँकेट आणि एक बेडशीट देण्यात आली आहे.