मुंबई – बॉलिवूडचा रियल बागी म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ पुन्हा एकदा आपला जबरदस्त अॅक्शन अवतार दाखवण्यास सज्ज झाला आहे. ‘गणपत’ या आपल्या आगामी चित्रपटातून टायगर लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. टायगर सिनेसृष्टीत खासकरून अॅक्शन सीनसाठी ओळखला जातो.
‘गणपत’ एक अँक्शन थ्रीलर चित्रपट यामध्ये टायगर सोबत अभिनेत्री क्रिती सेनन आणि बिग बी अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमीकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर टायगर श्रॉफने आपल्या इंस्ग्रामवर शेअर केले होते. तेव्हा पासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट होते. मात्र, प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram
अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अँक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ‘गणपत’ हा दोन भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यातील पहिल्या भागाची घोषणा करण्यात आलीये.
चित्रपटाचा पहिला भाग म्हणजे गणपत पार्ट एक 2023च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे. टायगर श्रॉफची पहिली पॅन इंडिया फिल्म असणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू , कन्नड आणि मल्याळम भाषेत देखील प्रदर्शित केला जाणार आहे.