मुंबई – पठाण चित्रपटाद्वारे नवे विक्रम रचणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच तिच्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईझ देणार आहे.आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर दीपिकाने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले.या चित्रपटात साऊथ स्टार प्रभास आणि बिग बी अमिताभ बच्चन देखील प्रमुख भीमीकेत आहे. ‘प्रोजेक्ट के’ असे या चित्रपटाचे नाव आहे/.
दीपिका आणि प्रभासने त्यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. यासाठी दोन्ही कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे पहिले पोस्टरही शेअर केले आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एक मोठा हात दिसत आहे, तसेच हाताच्या दिशेने तीन बंदूकधारी पुरुष बंदूक दाखवत उभे असल्याचे पोस्टरमध्ये दिसत आहे.
यासोबतच पोस्टरवर रिलीज डेट लिहिली आहे, त्यानुसार ‘प्रोजेक्ट के’ पुढील वर्षी म्हणजेच १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.”महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.. प्रोजेक्ट के 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल अशी पोस्ट दीपिकाने यावेळी शेअर केली आहे. या सायन्स फिक्शन चित्रपटाद्वारे दीपिका साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.
View this post on Instagram
‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून तो दोन भागात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग लोकांमध्ये सस्पेन्स निर्माण करण्याचे काम करेल, तर दुसऱ्या भागात त्याची पूर्ण कथा उलगडून समोर येणार आहे.