शिक्रापूर – बेल्हा-जेजुरी महामार्गावर धामारी (ता. शिरुर) आज (शुक्रवारी दि. 3) रात्री नऊच्या सुमारास टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत माय लेकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत दिलीप डोके (वय 20), विजया दिलीप डोके (वय 40) व ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय 20, तिघे रा. खडकवाडी, ता. आंबेगाव) अशी या तिघांची नावे आहेत. याबाबत संपत चंदर डोके (वय 45, रा. खडकवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक अक्षय बबन साकोरे (रा. चांडोली, राजगुरूनगर) याच्याविरोधात गुन्हे दाखल केला आहे. धामारी येथे बेल्हा-जेजुरी महामार्गावरून संकेत डोके हा त्याची आई व एका मित्रासह दुचाकीवरून (एमएच 14 एचआर 7073) धामारी बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत होता.
त्यावेळी शिक्रापूर बाजूने आलेल्या टेम्पोची (एमएच 14 जीयू 6880) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करीत आहेत.