Indian Railway Budget 2023-24: बजेटला अगदी काहीच दिवस बाकी आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला बजट सादर करतील. या बजटमध्ये भारतीय रेल्वेसाठी खूप मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार बजटमध्ये रेल्वेसाठी 35 हाइड्रोजन-ईंधन असणाऱ्या ट्रेन सुरु करण्याचा प्लॅन, 400-500 वंदे भारत ट्रेन, जवळपास 4,000 नवीन डिजाइन असलेले ऑटोमोबाइल कॅरियर कोच आणि जवळपास 58,000 वॅगनचा समावेश जाहीर केला जाऊ शकतो. या सगळ्यांची अंमलबजावणी येणाऱ्या तीन वर्षांमध्ये होऊ शकते.
रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, बजटमध्ये भारतीय रेल्वेसाठी (Indian Railways) 1.9 लाख करोड़ रुपये फंडच्या स्वरूपात दिले जाऊ शकतात. याद्वारे, भारत सरकारला त्याच्या रोलिंग स्टॉकचे आधुनिकीकरण (रेल्वे, डबे आणि वॅगन्स), रेल्वे ट्रॅकची सुधारणा, विद्युतीकरण आणि 2030पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे लक्ष्य साध्य करायचे आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानूसार, बजटमध्ये रोलिंग स्टॉक प्रोग्रामसाठी जी घोषणा होण्याची शक्यता आहे ती तीन वर्षांमध्ये पूर्ण केली जाईल यासाठी सुमारे 2.7 लाख करोड़ रुपये दिले जातील, जे आतापर्यंतच्या बजेटपेक्षा जास्त असतील. सूत्रांच्या सांगण्यानुसार बजटमध्ये न्यू एज रोलिंग स्टॉक व्यतिरिक्त 100 विस्टाडोम कोच बनवण्याचा प्लॅन आणि प्रीमियर ट्रेनच्या 1,000 डब्यांचे नूतनीकरण देखील समाविष्ट केले जाईल.
500 वंदे भारत वर खर्च केले जातील 65 हजार करोड़ –
500 वंदे भारतच्या निर्मितीसाठी जवळपास 65 हजार करोड़ रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे ट्रेनमध्ये प्रवाश्यांची सुरक्षा ध्यानात ठेवून रेल्वे सुमारे एक हजार कंपार्टमेंट्स मध्ये वॉटर-मिस्ट बेस्ड फायर एक्सटिंग्विशर लावण्याची प्लॅनिंग करत आहे.
हायड्रोजन ट्रेन हेरिटेज मार्गांवरून धावणार –
अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे आठ हेरिटेज मार्गांवर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाड्या सुरू करणार आहे. या मार्गांमध्ये कालका-शिमला, कांगड़ा वैली, दार्जिलिंग आणि नीलगिरी मार्गांचा समावेश आहे. वास्तविक पाहता रेल्वे या मार्गांना पूर्णपणे हरित बनवण्याच्या उद्देशाने काम करत आहे. भारतीय रेल्वे नॉर्थन रेल्वेच्या वर्कशाॅप मध्ये एक हाइड्रोजन फ्यूल ट्रेन चा प्रोटोटाइप बनवत आहे. याची चाचणी रन सोनीपत-जिंद सेक्शन वर केली जाईल.