मुंबई – दिवाळीत अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. तेव्हा पासून त्याचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.काल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीतून याबाबत प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांनी ट्रेलर शेअर करत शाहरुखला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र एका अभिनेत्याने चित्रपटाला डिझास्टर म्हंटल आहे.
After watching #PathaanTrailer I got shock of my life and I can say only this, what the fuck is this? How can #SRK does such a crap film? Story of #John film #ATTACK was also same which was a disaster. https://t.co/Nl0S37UbRw
— KRK (@kamaalrkhan) January 10, 2023
ट्विटरवरून शाहरुखच्या पठाण या चित्रपटावर टीका करणारा दुसरा तिसरा कोणी नसून कमाल आर खान आहे. केआरकेने पठाणबाबत प्रतिक्रिया देत ट्विट केले आहे. शाहरुख खान असा फालतू चित्रपट कसा करू शकतो ? असा सवाल केआरकेने उपस्थित केला आहे. तसेच जॉन अब्राहमच्या अटॅक या चित्रपटाची कथासुद्धा अशीच होती असही कमल आर खान आपल्या ट्विटमध्ये म्हटल आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद कुमार यांनी शेअर केलेल्या ट्विटला रिप्लाय देत कमल आर खान म्हणतो, भाई,देवसुद्धा या चित्रपटाला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकत नाही”.
Absolutely mind blowing #PathaanTrailer 👊🏻❤️ https://t.co/wD5Vga1x0n
— Anand Kumar (@iamanandkr) January 10, 2023
अॅक्शन आणि रोमान्सने पठाण चा ट्रेलर भरलेला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळतेय. या दोघांशिवाय जॉन अब्राहमचा व्हिलनवाला अंदाज ट्रेलरमध्ये दिसून येतोय. सध्या हा ट्रेलर सिनेरसिकांच्या पसंतीस पडत असून, अवघ्या वीस मिनिटातच ट्रेलरला एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. सोशल मीडियावर ट्रेलर विरोधात नेटकरी आणि शाहरुख फॅन्स फिडताना दिसत आहेत.