Hotel Sarthak Bhor – बाजरी भाकरीच्या जोडीला तांबडा रस्सा, रस्स्यावर लालसर रंगाची झणझणीत तर्री, तांबड्या मसाल्यात बनवलेला मटण खिमा अन् काळ्या मसाल्यातलं सुक्कं काळं मटण! अशी थाळी समोर आल्यानंतर मस्त चुरून-मुरून खाण्याचा मोह नॉन व्हेज प्रेमींना आवरेल का? नाही ना? तर या आठवड्यात आम्ही घेऊन आलोय अशीच झणझणीत, स्वादिष्ट काळ्या मटणाची थाळी! आता तुम्ही म्हणाल काळं मटण? हा काय प्रकार आहे? पण मित्रांनो भोरची ही काळ्या मटणाची थाळी खाल्ल्यानंतर तुम्हीही रितेश सारखं, ‘मला वेड लावलंय, लावलंय…’ गुणगुणाल!
पुण्यापासून दीड-दोन तासाच्या अंतरावर भोर – महाड हायवेवर ‘सार्थक’ नावाचं हॉटेल आहे (लोकेशन खाली देतोय). हॉटेलची खासियत म्हणजे इथल्या मालकीण बाई – उज्वला बांदल किचन स्वतः सांभाळतात! काळ्या मटणाची रेसिपीही त्यांचीच असून त्यासाठी लागणारे मसाले त्या घरीच बनवतात. दररोज किमान ३०० – ३५० खवय्ये काळ्या मटणावर ताव मारण्यासाठी हॉटेलला भेट देतात.
तर ही काळ्या मटणाची थाळी नेमकी कशी बनवली जाते? आणि तिची टेस्ट वेड लावणारी आहे का? सांगतेय पियुशा आजच्या फुडीज कट्टयात…
लोकेशन – https://goo.gl/maps/fQRj9H7y88RSrspX9
कॉन्टॅक्ट – 8055181935