मुंबई – 1999 सालच्या एका हत्या प्रकरणातून गॅंगस्टर छोटा राजनला ( gangster chhota rajan ) मुंबईतील सत्र न्यायालयाने आरोपांमधून मुक्त केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका स्दस्याच्या हत्येचा आरोप छोटा राजनवर होता. या प्रकरणातील हत्येचे आरोप हटवण्यात यावेत, अशी छोटा राजनची याचिका न्यायालयाने 17 डिसेंबरला मान्य केली होती. या संदर्भातील न्यायालयाचा सविस्तर निकाल आज (मंगळवारी) उपलब्ध झाला.
दाऊद टोळीतील एक सदस्य अनिल शर्मा याची छोटा राजनच्या टोळीने 2 सप्टेंबर 1999 रोजी अंधेरीत हत्या करण्यात आली होती. 12 सप्टेंबर 1992 रोजी जे.जे. रुग्णालयात झालेल्या गोळीबारामध्ये अनिल शर्माचा हात होता. प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्याच्या हत्येसाठी दाऊदच्या टोळीने हा गोळीबार घडवून आणला होता.
राजन आणि दाऊद यांच्यातील संघर्षामध्ये अनिल शर्मा मारला गेला असल्याचा आरोप सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी छोटा राजनच्याविरोधातील गुन्हेगारी स्वरुपाचे पुरावे सादर करण्यात न आल्यामुळे त्याची मुक्तता करण्यात आली. ( gangster chhota rajan )