इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या दूतावासावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर पाक आणि अफगाणिस्तानमधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. पाक दूतावासावर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे उच्च पदस्थ अधिकारी उबाईद-उर-रेहमान निझामणी हे थोडक्यात बचावले होते.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी तालिबानने सत्तेची सूत्रे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने अनुकूल भूमिका घेतली होती. मात्र 2022 या वर्षात दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीपेक्षा खूपच खराब झाले आहेत.
तालिबानने गेल्या वर्षी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पाकिस्तानबरोबर सीमावाद उफाळून आला होता. अफगाणिस्तानातील तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या कारवाया पाकिस्तानमध्ये वाढू लागल्यावर पुन्हा दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माम झाला होता. याच तेहरिक ए तालिबान पाकिस्तानने आता पाक सरकारबरोबरची युद्धबंदी समाप्त केल्यामुळे पाक सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक – राज्यपाल कोश्यारी
अफगाण तालिबानच्या विचारधारेशी मिळतीजुळती विचारधारा असलेल्या “टीटीपी’ आणि “इस्लामिक मुव्हमेंट उझबेकिस्तान’च्या नेटवर्कमुळे पाकिस्तानात दहशतवादी कारवाया पुन्हा वाढायला लागल्या आहेत.