मुंबई – मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर भाईगिरी आणि आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मराठीसह संतोषने हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखिल आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. आता संतोष दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. नुकतीच संतोषने साऊथमध्ये एक जाहिरात केली आहे.
संतोषने आपल्या सोशल मीडियावर ही जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीमध्ये तो फायटिंग सिन करताना आणि दुसरी भाषा बोलताना देखील दिसतोय.”ये अन्ना रासकला… विजू तू मेरेको दक्षिण की दिशा दिकाया उसकी दक्षिणा मै तेरेको जरूर द्येगा” अशा फणी कॅप्शनखाली ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे.
View this post on Instagram
ओट्स कंपनीची ही जाहिरात आणि संतोषाचा त्यातील हटके अंदाज प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालतोय. प्रेक्षक या जाहिरातीला भरभरुन प्रेम देत आहेत. अनेकांनी यावर फनी कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी संतोषला या जाहिरातीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. संतोष नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धारावी बँक या बहुचर्चित हिंदी वेब सिरीजमध्ये दिसला होता.