मुंबई – अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हंटल की डोळ्यसमोर येते ती सैराटमधली बुलेट चालवणारी आर्ची.रिंकून आजह आपला बिनधास्तपणा त्याच दिमाखात जपला आहे. सैराटनंतर रिंकून हिंदीसह इतर भाषांमध्येही सिनेमे केले. विशेष म्हणजे इतर भाषांमधील फॅन्सने रिंकूला तेव्हडेच प्रेम दिले जेवढे मराठी रसिकांनी दिले. इतर भाषांमधील सिनेमे करूनही रिंकू आपला मराठमोळा अंदाज विसरलेली नाही याचाच प्रत्येय रिकुने इंस्टाग्रामवरून टाकलेल्या व्हिडीओवरून येतो.
रिंकू आपल्या सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. तिने टाकलेला व्हिडीओ सध्या चाहत्यांना भुरळ घालतोय. ज्यात तिचा मराठमोळा लूक फॅन्सला आवडताना दिसतोय. यामध्ये रिंकूने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. हातात पारंपरिक पद्धतीने बांगड्या आणि अंगठी घातल्याने रिंकूचा लूक आणखी खुलून दिसत आहे. नाकात नथनी आणि गळ्यात मोत्यांचा हार यामुळे रिंकूचे सौंदर्य अजून खुलून दिसत आहे. अनेकांनी रिंकूच्या या मराठ्मोठ्या व्हिडिओवर हार्ट पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
रिंकुची फॅनफॉलोविंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रिंकू शेवटची नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटामध्ये दिसली होती. रिंकूने केलेला वास्तवदर्शी अभिनय अनेकांना आवडला होता. झुंडनंतर रिंकूच अनेकांनी कौतुकही केलं होत. मराठमोळ्या लूकमधील रिंकूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.