गुरुग्राम – अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोहना येथील दमदमा तलावाजवळ गायक दलेर मेहंदीसह तीन लोकांचे फार्म हाऊस सील केले. नगररचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. जिल्हा नगर नियोजक (डीटीपी) अमित माधोलिया म्हणाले, ‘हे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बांधलेले अनधिकृत फार्महाऊस होते. ही तिन्ही फार्महाऊस सील करण्यात आली आहेत. अरवली रेंजमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय हे बनवण्यात आले होते.’
सोन्या घोष विरुद्ध हरियाणा राज्य या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशानंतर पोलिसांच्या मदतीने तीन फार्महाऊसवर कारवाई करण्यात आली. सदर सोहना येथील स्टेशन हाऊस ऑफिसर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तेथे तैनात करण्यात आले होते.
विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की तीन फार्महाऊसपैकी एक गायक दलेर मेहंदी यांचे आहे जे सुमारे दीड एकरवर बांधले गेले आहे.