Gurugram Cafe । गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर ५ जणांची प्रकृती अचानक बिघडली. अशी बातमी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायलर झालेल्या बातमीनुसार माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर ५ जणांची प्रकृती अचानक बिघडली. यावेळी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरुग्राम के एक बार में माउथ फ्रेशनर खाते ही 5 लोग बीमार,खून की उल्टियां pic.twitter.com/kFanq9m2Ro
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) March 4, 2024
व्हायरल व्हिडिओमध्ये अंकित कुमार पत्नी आणि मित्रांसह ला फॉरेस्टा कॅफेमध्ये डिनरसाठी गेले. रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी माऊथ फ्रेशनर घेतले तेव्हा त्याला तोंडात जळजळ आणि उलट्या होऊ लागल्या. काही वेळाने त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. सर्वांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पाचपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.’
मात्र डॉक्टरांनी यावर आपली भुमीका स्पष्ट केली आहे. डॉक्टर म्हणाले,’पाच जणांनी जे खाल्ले ते खरे तर (कोरडे बर्फ) ड्राई आइस होते. हे कार्बन डायऑक्साइडचे घनरूप आहे. हे कूलिंग एजंट म्हणून वापरले जाते. आता ते वैद्यकीय ते अन्न उद्योगापर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरले जात आहे.
दरम्यान, पीडितांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रेस्टॉरंट मालक विरुद्ध एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकितने आपल्या मुलीला आपल्या कुशीत घेतले होते, त्यामुळे ती माऊथ फ्रेशनर घेऊ शकत नव्हता. ग्रुपमधला तो एकटाच होता ज्याला काहीही झालं नाही. दरम्यान पोलिसांनी रेस्टॉरंटच्या मालकावर गुन्हा दाखल केला
हेही वाचा
Kira Advani । ‘डॉन 3’ चित्रपटासाठी कियाराने घेतली 13 कोटी ‘फी’