जगातील प्रसिद्ध संदेष्ट्यांमध्ये बुल्गेरियातील अंध संदेष्टयी बाबा वेंगा यांचा समावेश आहे. भाकितांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशातील नॉस्ट्राडेमस म्हणतात. भविष्यवाणीबद्दल त्यांची नेहमीच चर्चा असते. आता बाबा वेंगाप्रमाणेच एका १९ वर्षीय मुलीची भाकीतंही खरी ठरू लागली आहेत.
हन्ना कॅरोल असे या मुलीचे नाव असून तिला नव्या युगाची ‘बाबा वेंगा’ म्हटले जात आहे. अवघ्या १९ वर्षीय हन्ना कॅरोलने २०२२ या वर्षासाठी २८ मोठ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. यापैकी १० अंदाज खरे ठरले आहेत. बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील दहशतवादी संघटना अल कायदाचा ९/११ चा हल्ला यासह अनेक भाकितं केली होती, जी खरी ठरली आहेत. या १९ वर्षीय तरुणीचे आतापर्यंत कोणते अंदाज खरे ठरले आहेत ते जाणून घेऊया.
हन्ना कॅरोल अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सची आहे. वयाच्या १९व्या वर्षी केलेल्या भविष्यवाणीमुळे तो चर्चेत आहे. तिने २०२२ च्या सुरुवातीला राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूबद्दल सांगितले होते, जे पूर्णपणे खरे ठरल्याचे सिद्ध झाले आहे. या वर्षी जानेवारीमध्ये तिने किम कार्दशियनचे ब्रेकअप, हॅरी स्टाइल्स आणि बियॉन्सेचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्रा आई होण्याचे भाकीत केले.
एका मीडिया रिपोर्टनुसार, १९ वर्षीय हन्ना कॅरोलने पॉप कल्चर किंवा सिनेमा इंडस्ट्रीशी संबंधित बहुतेक भाकीत केले आहेत. हन्नाने केंडल जेनरचा साखरपुडा, हेली बीबर गरोदर राहणे, टायलर स्विफ्टचा विवाह,२०२२मध्ये वन डायरेक्शन बँडचे रियुनियन यांचा अंदाज लावला आहे.
बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी अनेक भाकिते केली होती जी खरी ठरली. बाबा वेंगा यांनी जगाच्या अंताची भविष्यवाणी केली. ५०७९ साली जगाचा अंत होईल असे त्यांनी सांगितले आहे. बाबा वेंगाचे २०२२ सालासाठीचे दोन भाकीतही खरे ठरले आहेत.
हन्नाने खुलासा केला आहे की तिला पॉप कल्चर आणि सेलिब्रिटींमध्ये जास्त रस आहे. यामुळे, ती त्याच्याबद्दल बहुतेक अंदाज बांधते. यंदाचे भाकीत खरे ठरले नाहीत, तर येत्या काही वर्षांत ते नक्कीच खरे ठरतील, असे हन्ना म्हणाली.