नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात आज सोने आणि चांदीच्या दरात भरीव वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 161 रुपयांनी वाढून 50,882 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 1,010 रुपयांनी वाढून 58,039 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,665 डॉलर व चांदीचा दर 19.36 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होती. इतर जागतिक चलनाच्या तुलनेत डॉलरच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे, त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले.