वडगाव मावळ (प्रतिनिधी)- काम केले म्हणून श्रेय घेण्यासाठी आलो नाही, तर गावचे गावपण जपा आणि गावचा विकास साधा हे आवाहन करायला मी आलोय. पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून घेतली. क्षणीक आनंदासाठी गावाला कीड लावू देऊ नका, असे सूतोवाच करताना गावपण जपा, मतभेद विसरून विकास साधा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.
आमदार शेळके यांच्या पुढाकारातून 4 कोटी 36 लाख रूपये विकासनिधीतून सूरू करण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे गहुंजे येथे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, गावचा विकास झाला पाहिजे, ही अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी करायला हवी. गावच्या विकासासाठी करातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊन गावातील प्रलंबित मिळकतीच्या नोंदी प्रशासनाला करायला लावल्या. विकासाची कामे दर्जेदार करून घ्या, अशी सूचना शेळके यांनी यावेळी केली.
यावेळी महापुरूषांच्या प्रतिमांचे आमदार शेळके यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. गहुंजे ग्रामस्थांच्या वतीने ढोल- लेझीम च्या गजरात आमदार शेळके यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष राक्षे, नरेंद्र ठाकर, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा दिपाली गराडे, सरपंच कुलदीप बोडके, पुणे महानगर समितीच्या सदस्या दिपाली हुलावळे, संदीप आंद्रे, प्रविण झेंडे चंद्रकांत दाभाडे, दतात्रय पडवळ, नारायण ठाकर, नितीन मुऱ्हे, सुनील दाभाडे, सचिन मुऱ्हे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी संभाजी बोडके, मधुकर बोडके, गुलाबराव बोडके, हिरामण बोडके, उत्तम बोडके, मच्छिंद्र बोडके, गोरक्षनाथ बोडके, संजय बोडके, शितल बोडके, मंदाकिनी बोडके, हर्षदा बोडके, पुजा बोडके, भामाबाई बोडके, वंदना तरसयांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उत्तमराव बोडके यांनी प्रास्ताविक केले. निर्गुणराव बोडके यांनी सूत्रसंचालन केले. शीतल बोडके यांनी आभार मानले.