लंडन – सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा मानवी आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे आता ध्वनी प्रदूषणाबाबत एक नवीन माहिती समोर आली असून दर तीस वर्षांमध्ये गोंगाटाचे प्रमाण दुप्पट होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून हृदयविकार आणि स्ट्रोक या विकारांचा धोका जास्त वाढला आहे ड्युक युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल स्कूल मधील काही संशोधकांनी करोनाचा प्रभाव संपलानंतरच्या कालावधीमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या परिस्थितीवर संशोधन केले असता त्यांना ही गोष्ट लक्षात आली करोनावर आता नियंत्रण मिळवले, असल्याने सर्व व्यवहार सामान्य झाले आहेत सामान्य नागरिकांच्या रोजच्या टीव्ही पाण्याच्या सवयीपासून इतर सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच होऊ लागल्या आहेत.
त्याचाही परिणाम ध्वनिप्रदूषण वाढण्यावर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये रुग्णवाहिका किंवा पोलिस यंत्रणांचे जे सायरन आहेत त्यांच्या आवाजामध्येही दुप्पट वाढ झाल्याचे अभ्यासात म्हणण्यात आले आहे शांत वातावरण आणि शांत मानसिकता मानवी प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त असून अशा वातावरणामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात तर गोंगाटयुक्त विरोधी वातावरणामध्ये हृदयविकार किंवा स्ट्रोकसारखे आजार जडण्याचा धोका सर्वाधिक असतो असेही या संशोधनात सांगण्यात आले आहे.
मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर ईमके कस्टरे हे संशोधन केले असून सामान्य नागरिकांनी गोंगाटापासून दूर राहणेच पसंत करावे असे त्यांनी म्हटले आहे सतत गोंगाटात वावरणाऱ्या माणसांचा एकटेपणा नंतर वाढत जातो आणि त्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात मॅनहटनमधील प्राचार्य रिचर्ड सोलवेस यांनी समान प्रकारचे संशोधन केले असून त्यांनी गोंगाटापासून वाचण्यासाठी आणि याच्या दुष्परिणामपासून दूर राहण्यासाठी लोकांनी मौन पाळावे आणि एकांतात ध्यानधारणा करावी असे सुचवले आहे तर पेन्सिलीवनिया विद्यापीठातील संशोधक रिचर्ड बॅसनर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोंगाटामुळे हार्मोन्सचे संतुलनही बिघडू शकते आणि मानसिक तणाव निर्माण होतो.