मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे, मी सुद्धा वंशवादाचे प्रतिक आहे. पण मला कोणीही संपवू शकत नाही, पंतप्रधान मोदीही मला संपवू शकत नाहीत. कारण मी तुमच्या मनात आहे. जोपर्यंत मी तुमच्या मनात आहे तोपर्यंत मला कुणीही संपवू शकत नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले,’कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या जर त्यांच्याच देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्याबाबतीत असं बोलत असतील तर काय बोलावं. मला एवढंच माहिती आहे की, मागील विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं, काय नाही झालं जनता काय करू शकते हे सगळं माहिती आहे.’
ते पुढे म्हणाले,’पंकजा या त्यांच्या पक्षात नाराज आहेत की नाहीत, हे मी कसं काय सांगू शकतो. हे आपणच त्यांना विचारलं काल मोदी साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याही वेगळ्याप्रकारावर त्यांना विचारलं तर आपल्याला कळेल. तसेच, त्या त्यांच्या पक्षात नाराज आहेत की, नाहीत मी कसे सांगू शकत नाही.’