मंचर – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथून मायलेकी बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दत्तात्रय मारुती बांगर (वय 35, रा. पिंपळगाव खडकी, ता. आंबेगाव) यांनी दिली आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय बांगर यांची पत्नी विनंती बांगर (वय 30) मुलगी परी बांगर (वय 4) हिला घेऊन शनिवारी (दि. 17) फिर्यादी दत्तात्रय बांगर याची बहीण शकुंतला हरिभाऊ भोर (रा. अवसरी खुर्द, तांबडेमळा, ता. आंबेगाव) हिच्या घरी पित्राच्या जेवणासाठी गेली होती. सोमवारी (दि. 19) दुपारी ती मुलीसह पिंपळगाव खडकी येथे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र ती घरी आली नाही.
संध्याकाळपर्यंत वाट पाहून बांगर यांनी अवसरी खुर्द आणि परिसरात या दोघींचा शोध घेतला; पण त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर बांगर यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली. पुढील तपास पोलीस जवान डावखर करीत आहेत.
बेपत्ता महिलेचे वर्णन – विनंती दत्तात्रय बांगर (वय 30), उंची 5 फूट 6 इंच, अंगाने मध्यम, रंग सावळा, केसकाळे, नाक सरळ, गळ्यात मणी मंगळसूत्र, लाल रंगाची साडी नसली असून, मराठी भाषा बोलते. मुलीचे वर्णन – परी दत्तात्रय बांगर (वय 4), उंची 2.5 इंच, रंग गोरा, केस बारीक, अंगात पांढऱ्या रंगाचा फ्रॉक.