मुंबई – सुशांत सिंग राजपूतला या जगाचा निरोप घेऊन बराच काळ लोटला असला तरी तो आजही त्याच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने नुकतीच इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. भावूक होऊन बॉलिवूडवर निशाणा साधणाऱ्या या पोस्टच सुशांतच्या फॅनकडून स्वागत होताना दिसतंय.
सुशांत सिंग राजपूतची बहीण मीतू सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने ‘ब्रह्मास्त्र’चा उल्लेख करत बॉलिवूडवर भाष्य केलं आहे. सुशांतचा फोटो शेअर करताना मीतू सिंगने लिहिले- ‘सुशांतचे ब्रह्मास्त्र या बॉलिवूड उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे आहे. बॉलीवूडला नेहमीच लोकांवर राज्य करायचे आहे परंतु परस्पर आदर आणि नम्रता दाखवण्यासाठी तेकधीही थांबले नाही.
मीतूने पुढे लिहिते, ज्यांची नैतिक मूल्ये खूप उच्च आहेत अशा लोकांना आपण आपल्या देशाचा चेहरा कसा बनवू शकतो. नाटक करून जनतेची मने जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न व्यर्थ गेला आहे. गुणवत्ता आणि नैतिक मूल्ये या एकमेव गोष्टी आहेत ज्यांना प्रशंसा आणि आदर मिळेल. मीतूने आपल्या शब्दांमध्ये ब्रम्हास्त्रचा केलेला उल्लेख पाहून नेटकऱ्यांना तिने रणबीर आणि आलियावर भाष्य केल्या सारखे वाटत आहे.
View this post on Instagram
या पोस्टनंतर सुशांत सिंग राजपूतचे चाहते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये सुशांतचे चाहते त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये काही लोक #justiceforsushantsinghrajput लिहित आहेत, तर अनेक लोक #boycottbollywood लिहून आपला राग काढत आहेत.