मुंबई – चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. एका वृत्तसंस्थेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांच्या भेटीचे फोटो पोस्ट करून याबाबत माहिती दिली. रोहित शेट्टीने अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्च्यांना उधाण आले.
Film director Rohit Shetty meets Union Home Minister Amit Shah in Mumbai, Maharashtra. pic.twitter.com/La4Nue5BWh
— ANI (@ANI) September 5, 2022
रोहित शेट्टीला भेटण्यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी RRR स्टार ज्युनियर NTR सोबत हैदराबादमध्ये भेट घेतली होती. अमित शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर साऊथ सुपरस्टारसोबतचे काही फोटो शेअर केली होते. शहा यांनी तेलुगू स्टारला भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि ज्युनियर एनटीआरचे कौतुक देखील केले होते.
Union Home Minister Amit Shah met Telugu actor Jr NTR, in Hyderabad today. pic.twitter.com/MTgOuYHNu9
— ANI (@ANI) August 21, 2022
रोहित शेट्टी आणि अमित शहा यांची भेट नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र नेटकऱ्यानी रोहित शेट्टी आता मोठा काहीतरी धमाका करणार असलयाचे सोशल मीडियावर म्हंटले आहे. तर अनेकांनी रोहित शेट्टीला अमित शहा यांच्या चित्रपट काढण्याचा सल्ला दिला आहे.