मुंबई – जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. जनता गद्दारांना धडा शिकवेल. यांच्याकडे सगळेच पैशांनी काम होते. माझ्याकडे माझी रक्तामांसाची, जिवाला जीव देणारी माणसे आहेत. तुम्ही सदस्यपत्र घेऊन आलेला आहात तो मी पहिला टप्पा मानतो.
न्यायालयात काय व्हायचे ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. निवडणुका कधी एक येतात आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो. पण निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत आहे, असं मला वाटत नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.