लंडन : भारत स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनीही आपापल्या घरी तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा केला. याशिवाय इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसननेही सर्व भारतीयांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून हिंदीत ट्विट करून भारतीयांनी शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/KP24/status/1559103363169615876?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559103363169615876%7Ctwgr%5E562eef7db271dbb0849b4df5f7d368d47097f56b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fkevin-pietersen-congratulated-independence-day-in-hindi-said-this-big-thing-2192569
इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने आज आपल्या ट्विटर हँडलवरून ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना हिंदीत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विट केले की, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. अभिमान बाळगा आणि उंच उभे रहा. तुम्ही सर्वांसाठी चांगले भविष्य निर्माण करत आहात.