मुंबई – अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. अशात सोनम एका कारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनम आपल्या अभिनयसोबत इंडस्ट्रीत स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. नुकतंच सोनमने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने रणबीर कपूरची थट्टा केल्याचे समजते.
कॉफी विथ करणच्या सोनमने हजेरी लावलेल्या शोचा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोवरून हे स्पष्ट झाले आहे की यावेळीही सोनम चांगलीच मस्ती करणार आहे. मात्र यावेळी तिच्या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीतील काही खास लोकांचे मन दुखावले जाऊ शकते, त्यापैकी एक आहे आलिया भट्ट आणि दुसरा आहे रणबीर कपूर.
सोनमने रणबीर कपूरची खिल्ली उडवली
यावेळी सोनम कपूर तिचा चुलत भाऊ अर्जुन कपूरसोबत कॉफी विथ करणमध्ये दिसणार आहे. प्रोमोनुसार सोनम रणबीरचे कौतुक करताना दिसत आहे. ती म्हणते की रणबीर सध्या सर्वोत्कृष्ट आहे कारण तो या क्षणी सर्वत्र आहे. तो अयान मुखर्जीच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. पण जेव्हा करणने सोनमला त्याच्या चित्रपटाचे नाव विचारले तेव्हा ती ब्रह्मास्त्र ऐवजी शिवा नंबर 1 म्हणते. हे ऐकून सगळे हसायला लागतात. अशा प्रकारे सोनमने पुन्हा एकदा भोळेपणा दाखवत रणबीरची खिल्ली उडवल्याची जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु आहे.